नळेगाव,: मुंशी प्रेमचंद हे हिंदी साहित्यातील प्रगतीवादी कथाकार आणि कादंबरीकार होते. त्यांनी आपल्या कथात्मक साहित्यातून समाजाला विकासाची व माणुसकीची दिशा दिली. समाजात असलेल्या विविध समस्यावर त्यांनी आपल्या साहित्यातून लेखन केले. त्यांचे साहित्य आजही समाजाला दिशा व प्रेरणा देणारे आहे असे मत नळेगाव येथील शिवजागृती वरिष्ठ महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रेमचंद यांच्या जयंतीनिमित्त संपन्न झालेल्या कार्यक्रमात बोलताना हिंदी विभाग प्रमुख डॉ.बालाजी भुरे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. प्रशांत पात्रे यांनी केले. प्रस्ताविक डाॅ. श्रीदेवी बिरादार यांनी केले तर आभार प्रा. विशाल सोनवणे यांनी मानले. याप्रसंगी गौंड वैष्णवी या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.